सेऊल
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपला नवा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही सादर केला आहे. दक्षिण कोरीयन कंपनीचा हा नवा टीव्ही पाहणाऱयांना मनोरंजनाचा अमर्याद आनंद मिळवून देईल, असा दावा केला गेला आहे. 110 इंचाच्या मायक्रो एलइडी टीव्हीची किंमत 1 लाख 56 हजार 400 डॉलर्स इतकी असणार असल्याचे योनहॅप समाचार एजन्सीकडून सांगण्यात येते. सदरच्या टीव्हीसाठी प्री ऑर्डरची सुरूवात महिन्याअखेर होणार असून 2021 च्या पहिल्या तिमाहीत या टीव्हीचे अधिकृत लाँचिंग होणार आहे. सुरूवातीला सदरचा टीव्ही अमेरिका, मध्य पूर्व देश आणि युरोपिय देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.