या आधी मलेशियामध्ये झाला सादर- सादर करण्याची तारीख निश्चित नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सॅमसंग कंपनीने मागील काही महिन्यांमध्ये भारतामध्ये विविध प्रकारचे स्मार्टफोन्स सादर केले आहेत, यामध्ये लेटेस्ट गॅलेक्सी ए 52 आणि गॅलेक्सी ए 72 या मॉडेलचाही समावेश आहे. सॅमसंग गॅलेक्सी आवृत्तीसह अन्य मॉडेल बाजारात आणण्यावर काम करत आहे. ज्यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम 62 हे मॉडेल असून या स्मार्टफोनचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये असणारी 5-जी क्षमता होय.
लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 62 5 जीला अधिकृतरित्या सादर करण्याअगोदर सर्व प्रकारची तयारी पूर्ण करणार असल्याची माहिती आहे. परंतु कंपनीने आतापर्यंत गॅलेक्सी एम62 5-जीच्या सादरीकरणाच्या तारखेबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.
सॅमसंग गॅलेक्सी एम 62
सॅमसंग कंपनीने मलेशियामध्ये गॅलेक्सी एम 62 5जी या मॉडेलचे सादरीकरण केले होते. मूळ मॉडेल गॅलेक्सी एफ 62 चीच नवी आवृत्ती होती. ज्याला मागील महिन्यात भारतात सादर करण्यात आले होते.
काय असणार सुविधा
? सॅमसंग गॅलेक्सी एम 62 5जी मॉडेलमध्ये 6.7 इंच पूर्ण एचडी डिस्प्ले
? ब्हदे 9825 प्रोसेसरसह असून यामध्ये 8 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज
? एम 62 मध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा
? सदरच्या मॉडेलमध्ये 7000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार