वृत्तसंस्था/ मुंबई
गणेश चतुर्थीला सॅमसंगने ग्राहकोपयोगी वस्तुंवर खास सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. यात जवळपास 20 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक व इएमआय योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे
गणेश चतुर्थी साजरी करताना सॅमसंग या भारताच्या सर्वात विश्वसनीय इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपनीने टेलिव्हिजन्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, मायक्रोव्हेव आणि एअर कंडिशनर्सवर आकर्षक सवलती दिल्या आहेत. सॅमसंगने आकर्षक फायनान्स ऑफर्स (वित्त योजना) सादर केल्या आहेत, जसे जवळपास 20 टक्के अतिरिक्त कॅशबॅक आणि 990 रूपये इतका कमी सुलभ ईएमआय. सदरच्या ऑफर्स महाराष्ट^ामध्य्ाs 21 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. निवडक सॅमसंग टेलिव्हिजन्स खरेदी करणाऱया ग्राहकांना सॅमसंग साऊंडबार्सवर जवळपास 50 टक्के सूट मिळू शकते. तसेच त्यांना निवडक टेलिव्हिजन्सवर 2 वर्षांची वॉरंटी आणि 10 वर्षांची नो-स्क्रीन बर्न इन वॉरंटी देखील मिळेल. निवडक वॉशिंग मशिन्स खरेदी करणाऱया ग्राहकांना 12 वर्षांची मोटर वॉरंटी मिळणार असल्याचे समजते.