72 तासात 1 लाख फोन्सना बुकिंगची ऑर्डर : नवा विक्रम प्रस्थापीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियातील कंपनी सॅमसंगच्या गॅलक्सी एस 22 स्मार्टफोनला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभताना दिसत आहे. सदर फोनच्या प्रीबुकिंगला ग्राहकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू अँथनी पूल्लन यांनी सांगितले की, सहज सोप्या सुधारणांसह प्रिमियम फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये कंपनीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. छोटय़ा शहरांमध्ये स्मार्टफोन खरेदीसाठी आर्थिक पर्याय उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
एस 22 हा स्मार्टफोन लाँच केल्यानंतर 72 तासातच 1 लाखहून अधिक जणांनी सदरचा फोन प्रीबुक केला आहे. सध्याला प्रीबुकिंगचा हा आकडा 1 लाख 40 हजारवर पोहोचला आहे. या अंतर्गत सादर होणाऱया विविध प्रकारच्या स्मार्टफोनची किंमत 72 हजार 999 रुपये ते 1 लाख 18 हजार 999 रुपये पर्यंत असणार आहे.
वैशिष्टय़े पाहुया
स्टोरेज- 8 जीबी व 128 जीबी, 8 जीबी 256 जीबी
रंग- फाँटम व्हाइट, फाँटम ब्लॅक, ग्रीन, वायोलेट, क्रीम, स्काय ब्ल्यू, ग्रॅफाइट
वजन- 167 ग्रॅम
डिस्प्ले- अमोलेड 2 एक्स
स्क्रीन- 6.1 इंच स्क्रीन
सुरक्षा- कॉर्निंग ग्लोरिला ग्लास विक्टस प्लस
ऑपरेटिंग सिस्टम- अँड्रॉइड 12, वन युआय 41
कॅमेरा- ट्रिपल, 50 एमपी, 10 व 12 एमपी