न्यूयॉर्क
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सला वेरिझॉन कम्युनिकेशनकडून 5 जी नेटवर्कच्या विकासासाठी 6.65 अब्ज डॉलर्सचे कंत्राट मिळाले आहे. सॅमसंगकडून यावेळी देण्यात आलेल्या नियम आणि सूचनांच्या आधारे ही ऑर्डर 2025 पर्यत देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. या अगोदर सॅमसंग आणि वेरिझॉन एकत्रितपणे काम करत आलेले आहेत. वेरिझॉनकडून कॅलिफेर्निया टेक्सास आणि इंडियानामध्ये काही ग्राहकांना देण्यात येणाऱया 5 जी सेवेमध्ये सॅमसंगचे योगदान मिळालेले आहे.