ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दक्षिण कोरियाचे टेक जायंट सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष ली कुन-ही यांचे रविवारी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. सॅमसंगने निवेदन जारी करून कुन-ही यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
कुन-ही यांना2014 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यानंतर कंपनीची जबाबदारी ली यांचा मुलगा आणि सॅमसंग इलेक्ट्राॅनिक्सचे उपाध्यक्ष ली जाॅय-यंग यांच्यावर सोपवण्यात आली होती.
दरम्यान, दक्षिण कोरिया ही जगातील 12 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सॅमसंगच्या व्यवसायाचे या अर्थव्यवस्थेत प्रचंड वर्चस्व आहे. कंपनीची एकूण उलाढाल दक्षिण कोरियाच्या जीडीपीच्या एक पंचमांश आहे. दक्षिण कोरियाच्या आर्थिक बळकटीमध्ये सॅमसंगचा किती मोठा वाटा आहे, हे यावरून दिसून येते. भारतात टाॅपच्या स्मार्टफोन विक्रीच्या लिस्टमध्ये सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.