वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियन तंत्रज्ञान कंपनी सॅमसंग यांनी आपल्या गॅलक्सी एस 22 सिरीज च्या स्मार्टफोनच्या निर्मितीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा गॅलक्सी एस 22 या स्मार्टफोनचे काही दिवसांपूर्वी लाँचिंग झाले आहे. गॅलक्सी एस 22 स्मार्टफोनच्या उत्पादनामध्ये येणाऱया काळामध्ये 20 टक्के इतकी वाढ करण्याचे कंपनीने ठरवले आहे. एकंदर येत्या काळामध्ये 30 दशलक्ष स्मार्टफोनची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये 12 दशलक्ष स्मार्टफोन एस 22 फोनचे असतील.
गॅलक्सी एस 22 ला 6.8 इंचाचा डिस्प्ले असून डायनामिक अमोलेड 2 एक्स डिस्प्ले असणार आहे तर 5000 एमएएचची बॅटरी फोनला दिली आहे. फँटम ब्लॅक, फँटम व्हाईट, ग्रीन आणि बरगंडी अशा रंगांमध्ये सदरचा स्मार्टफोन सादर केला आहे.