नवी दिल्ली
सॅमसंग गॅलक्सी नोट 10 च्या किंमतीत कंपनीने कपात केली असून हा फोन वन प्लस 8 पेक्षा कमी किंमतीत मिळणार आहे. सॅमसंगचा फोन 6 जीबी प्रकारात असून यांच्या आता किंमती अनुक्रमे 37 हजार 999, 39 हजार 999 रुपये असणार आहेत. दुसरीकडे सॅमसंग कंपनी 5 हजाराची सवलतही देऊ करणार आहे. सिटीबँकच्या कार्डधारकांना गॅलक्सी नोट 5 हजाराने स्वस्त मिळणार आहे. याशिवाय मोबाईल खरेदीच्या काही व्यवहारात 2 हजाराची सवलत कंपनी देऊ करते.