क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
एफसी गोवाचे दोन फुटबॉलपटू यंदाच्या आयएसएल फुटबॉल मोसमात अन्य संघांना खेळणार आहेत. मागील चार मोसम एफसी गोवासाठी असलेल्या सॅरिनियो फर्नांडिसने संघाकडून कायमस्वरूपी ट्रान्सफर घेतली आहे तर 20 वर्षीय अमरजित सिंग कियाम हा ऑनलोनवर ईस्ट बंगालसाठी गेला आहे.
सॅरिनियो फर्नांडिस आरंभी 2017 मध्ये धेंपो स्पोर्ट्स क्लबमधून एफसी गोवा संघात आला. 18 वर्षांखालील एफसी गोवा संघाचे त्याने प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर 2018 मध्ये तो एफसी गोवाच्या डेव्हलपमेंटल संघासाठी गेला. याचवर्षी एफसी गोवाने गोवा फुटबॉल संघटनेच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद प्रथमच मिळविले. तो खेळलेल्या एफसी गोवाने प्रो. लीग तसेच 20 वर्षांखालील तासा गोवा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपदही मिळविले आहे. मागील मोसमात तो एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाचा कप्तानही राहिला आहे.
एफसी गोवाचा मीडफिल्डर अमरजित सिंग कियाम आता येत्या आयएसएल मोसमात ऑनलोनवर एससी ईस्ट बंगालसाठी खेळणार आहे. सीनियरस्तरीय फुटबॉल स्पध्x&त अनुभव मिळावा यासाठी एफसी गोवाने त्याला ऑनलोनवर पाठविले आहे.
फिफा विश्वचषक 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत अमरजितने भारतीय संघाचे कप्तानपद भुषविले होते. त्यानंतर तो आयएसएलमध्ये ज्गमशेदपूर एफसी तर आय-लीग फुटबॉल स्पर्धेत इंडियन ऍरोजसाठी खेळला. इंडियन ऍरोजसाठी ऑनलोनवर खेळल्यानंतर तो 2019 तो परत एकदा जमशेदपूर एफसीला आला आणि 15 सामने खेळला. गेल्या मोसमात तो एफसी गोवासाठी दोन वेळा तर इएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये चार सामन्यांत खेळला.