नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया विविध माध्यमांच्या आधारे जवळपास 5 हजार कोटी रुपयांचे समभाग भांडवल उभारणार आहे. आपले भांडवल जमा करण्यासाठी उपलब्ध असणाऱया साधनांचा वापर करुन बँक सार्वजनिक राईट्स इश्यूही लावणार असल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी येत्या सात ऑगस्ट रोजी होणाऱया समभागधारकांच्या वार्षिक बैठकीत सदरचा प्रस्ताव मंजुर करण्यात येणार असल्याचेही स्पष्टीकरण यावेळी दिले आहे.