फादर एडी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सेंटपॉल स्कूल आयोजित फादर एडी 17 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी सेंट पॉल्स, सेंट झेवियर, जीजी चिटणीस संघांची विजयी सलामी दिली. फिनिक्सला भरतेशने तर केएलएसला मराठी विद्यानिकेतनने बरोबरीत रोखले.
सेंट पॉल हॉस्टेल मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कमांडंट कर्नल स्वप्निल व्ही. टी., सेंट पॉल स्कूलचे प्राचार्य फादर साव्हीओ ऍब्रू, उप प्राचार्य सॅबेस्टिन परेरा, मॅनेजर रॉनी डिसोजा कॅन्टोन्मेंट, माजी उपाध्यक्ष साजिद शेख आदी उपस्थित होते. प्रारंभी पथसंचलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फटकाविण्यात आला. रेव्ह. फादर एडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहुण्यांना दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. क्रीडा शिक्षक ऍन्थोनी डिसोजा, रॉस्टीन जेम्स, अभिषेक चेरेकर, शुभम झेंडे, शुभम बांदेकर आदी उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात सेंटपॉल संघाने ज्ञान मंदिर संघाचा 6-0 असा पराभव केला. 6 व्या व 12 व्या मिनिटाला सेंट पॉलच्या सीमन याने सलग दोन गोल केले. 15 व्या मिनिटाला झिशानने तिसरा गोल केला. 20 व्या मिनिटाला अवीने चौथा गोल केला. 44 व्या मिनिटाला कुशलने 5 वा तर सीमनने 46 व्या मिनिटाला 6 गोल करून 6-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱया सामन्यात सेंट झेवियर्स संघाने ज्ञान प्रबोधन मंदिर संघाचा 9-0 असा पराभव केला. या सामन्यात 10, 11, 29, व 30 व्या मिनिटाला रेहान किल्लेदारने 4 गोल केले, 22 व 40 व्या मिनिटाल यश चिकोर्डेने 2 गोल केले. 28 व 32 व्या मिनिटाला अयान किल्लेदारने 2 गोल केले तर 44 व्या मिनिटाला झिशान कित्तूरने 1 गोल केला.
तिसऱया सामन्यात जी. जी. चिटणीस संघाने फिनिक्स पब्लिक संघाचा 2-0 असा पराभव केला. दहाव्या मिनिटात चिटणीसच्या रितेश मोरेने गोल करून 1-0 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱया सत्रात 35 व्या मिनिटाला झिशान तिगडीने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात सर्वोदय खानापूर संघाला भरतेशने 1-1 अशा बरोबरीत रोखले. 27 व्या मिनिटाला सर्वोदयच्या नीलने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात भरतेशच्या समर्थ पाटीलने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले.
पाचव्या सामन्यात केएलएसला मराठी विद्यानिकेतनने शून्य बरोबरीत रोखले. या सामन्यात अमन धोत्रे, कुणाल भांदुर्गे व नमित पाटील तर विद्यानिकेतनतर्फे सूरज देवाप्पाचे, दर्शन कम्मार, ओम यांनी गोल करण्याच्या नामी संधी दवडल्या त्यामुळे हा सामना बरोबरीत राहिला.
बुधवारचे सामने…
- एमव्हीएम वि. अमृता विद्यालय….. सकाळी 9 वा.
- कनक मेमोरियल वि. गोमटेश……… सकाळी 10 वा.
- एम. व्ही. हेरवाडकर वि. जी. जी. चिटणीस सकाळी 11 वा.
- संत मीरा वि. ज्ञान प्रबोधन……….. दुपारी 12 वा.
- सेंट मेरीज वि. विद्यानिकेतन……… दुपारी 1 वा.
- सेंट झेवियर्स वि. अमृता विद्यालय… दुपारी 2 वा.
- एम. व्ही. एम. वि. ज्ञानमंदिर…….. दु. 3 वा.
- गोमटेश वि. सर्वोदय सायंकाळी 4 वा.