कधीकाळी आर्थिक संकटाला तोंड देताना पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावे लागलेल्या एका महिलेने यशाचे शिखर गाठले आहे. तीन मुलांच्या आई असलेल्या 39 वर्षीय एडवुमी यांनी 2011 मध्ये पती सॅम्युअलसोबत मिळून जुने कपडे आणि बूट साफ करून ईबेवर विकण्यास सुरुवात केली होती. हळूहळू याची मागणी वाढल्याने एडवुमी यांनी पतीसोबत मिळून एक मोठा फॅशन बिझनेस उभा केला आहे. ती आता मोठा फॅशन ब्रॅड फ्लेयरची मालकीण आहे.
एडवुमी पूर्वी गणिताच्या शिक्षिक होत्या, परंतु आई झाल्यावर मुलाच्या देखभालीसाठी त्यांनी नोकरी सोडली होती. मुलांच्या देखभालीसोबत कुटुंबासमोरील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्या काहीतरी करू इच्छित होत्या. सर्वप्रथम जुन्या आणि कमी वापरलेल्या सामग्रीला साफ करून त्यांनी ऑनलाइन साइटवर त्यांची विकण्यास सुरुवात केली. पहिली विक्री मे 2012 मध्ये झाली होती. तीन मुलांची आई असलेली एडवुमी फॅशन फ्लेयरच्या कामासाठी दररोज पहाटे तीन वाजता उठते आणि मुले जागी होईपर्यंत निम्मे काम संपवत असते.
आशेचा किरण दिसत नसलेल्या लोकांनी ऑनलाईन सेलिंगची मदत घ्यावी. येथे कुठलेही मोठे बजेट किंवा अधिक सामग्रीची गरज नसते. केवळ एक जोडी बूटने सुरुवात करू शकता. जुने असल्यास त्याला नीट स्वच्छ करा आणि चांगले दिसू लागल्यावर साइटवर विक्रीसाठी पोस्ट करा. जर तुम्ही चांगले संशोधन करत असाल आणि स्वतःच्या ग्राहकांना आनंदी करण्यास यशस्वी ठरलात तर यश नक्की मिळते, असे एडवुमी यांनी म्हटले आहे.
एडवुमी आता बाजारातून जुन्या गोष्टी खरेदी करते आणि त्यांना योग्य स्थितीत आणून ऑनलाईन विक्री करते. 2020 मध्ये कोरोना महामारी दरम्यान त्यांना फॅशन फ्लेयरचे अस्तित्व संपणार अशी भीती वाटत होती, परंतु तेव्हा लोकांनी ऑनलाइन शॉपिंग वाढविली आणि त्यांचा बिझनेस अधिकच वाढला.