बेंगळूर/प्रतिनिधी
नोकरीच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याचा एक व्हिडीओ समोर आल्याने कर्नाटकच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या व्हिडिओमुळे भाजप नेते रमेश जारकिहोळी यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान या व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेने गुरुवारी आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यात असे म्हटले आहे की, तिच्या पालकांना पूर्ण सुरक्षा दिली गेली असेल तर ती विशेष तपासणी पथकाकडे (एसआयटी) हजर होण्यास तयार आहे.
व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये, त्या महिलेने मागील क्लिपचा उल्लेख केला ज्यात तिने वैयक्तिक संरक्षण मागितले होते. तिने सांगितले की, त्यांनी १२ मार्च रोजी एसआयटी आणि बेंगळूर पोलीस आयुक्तांना व्हिडिओ निवेदन पाठवले होते, परंतु दुसर्याच दिवशी माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला.
एसआयटीचे प्रमुख मुखर्जी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (वेस्ट) यांनी, महिलांनी असा कोणताही व्हिडिओ संघाकडे पाठविला नाही. “आम्ही तिला आत्तापर्यंत पाच नोटीस दिल्या आहेत, पण तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,” ते पुढे म्हणाले, “आम्ही तिला एसआयटीसमोर हजर राहण्याची विनंती केली आहे, किंवा आम्ही कुठे जायचे आहे हे ठिकाण, दिवस आणि वेळ सांगण्यासाठी विनंती केली आहे. तिला सुरक्षा प्रदान करा आणि तिचे म्हणणे नोंदवा, असे म्हंटले आहे.
गेल्या २३ दिवसांपासून ती महिला बेपत्ता आहे. गुरुवारी प्रसिद्ध केलेला दुसरा व्हिडिओ १ मिनिट १३ सेकंदाचा आहे. माध्यम व्यक्तींना जाहीर केलेली क्लिप लॅपटॉप वरून प्ले केली गेली आणि अज्ञात डिव्हाइसवरून रेकॉर्ड केली गेली. अधिकाऱ्यांना असा संशय आहे की ही महिला किंगपिनच्या सहाय्याने व्हिडिओ एका व्यक्तीकडे देत आहे. जी अधिकाऱ्यांना तिच्या ठिकाणाबद्दल काहीच सुगावा मिळू नये यासाठी दुसर्या डिव्हाइसवरून तो रेकॉर्ड करत आहे.