बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी जलसंपदामंत्री रमेश जारकिहोळी यांच्या लैंगिक सीडी प्रकरणाची चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी सरकारने घेतला.
गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी याविषयी माहिती देताना एडीजीपी सौमेंदू मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी या प्रकरणाच्या सर्व बाबींची चौकशी करणार असल्याचे म्हंटले आहे. चौकशीत सीडी कोणी तयार केली आणि प्रसिद्ध केली. याशिवाय माजी मंत्र्यांनी केलेल्या विधानाचाही समावेश आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यांनतर एसआयटीअहवाल सादर केल्यानंतर सरकार कारवाई करेल, असे म्हंटले आहे.
गृहमंत्र्यांनी म्हंटले की जारकिहोळीच्या एका पत्राच्या आधारे हे चौकशीचे आदेश देण्यात आले होते ज्यात त्यांनी मला राजकारणातून संपविण्यासाठी कट रचला असून यामागे काही मोठ्या नेत्यांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.