बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपचे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने राज्य सरकारकडे केल्याच्या एक दिवसानंतर मंगळवारी विरोधी पक्षातील आमदारांनी आपली भूमिका तीव्र करत सभागृहात गोंधळ घातला. सोमवारी काँग्रेस आमदारांनी जारकिहोळी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली होती.
कर्नाटक विधानसभेत कॉंग्रेस नेत्यांनी सरकारला ‘सीडी सरकार’ असे संबोधून जोरदार घोषणाबाजी केली. मंगळवारी सुरुवातीला आमदार कृष्णा भैरे गौडा आणि प्रियांक खार्गे यांनी ही मागणी केली.