वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय महिलांच्या 2019-20 च्या फुटबॉल लीग स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात माजी विजेत्या सेतु एफसीने आणि कीकस्टार्ट एफसीचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात सेतु संघातील संध्याने दोन गोल नोंदविले.
या विजयामुळे सेतु एफसी संघाने तीन गुण वसूल केले. रविवारच्या सामन्यात संध्याने 12 व्या मिनिटाला सेतु एफसीचे खाते उघडले. 39 व्या मिनिटाला सुमित्राने सेतु एफसीचा दुसरा गोल केला. संध्याने 90 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून कीकस्टार्ट एफसीचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत संध्याने आतापर्यंत तीन सामन्यांतून सात गोल नोंदविले आहेत. गोकुळाम केरळ एफसी संघातील एस. भंडारीने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामन्यांतून सर्वाधिक म्हणजे 14 गुण केले आहेत. सेतु एफसीचा या स्पर्धेतील पुढील सामना 6 फेब्रुवारीला बडोदा एफए संघाबरोबर होणार आहे.