मुंबई ः
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी नवा विक्रम प्राप्त करत बीएसई सेन्सेक्स निर्देशांक बंद झाला आहे. दिवसअखेर सेन्सेक्सने 1,181.34 अंकांची तेजी प्राप्त करत निर्देशांकाने 61 हजारांवर झेप घेतली. यामध्ये निफ्टीनेही शेवटच्या दिवशी 52 आठवडय़ांची सर्वोच्च कामगिरीची नोंद केली. अमेरिकेत अपेक्षेपेक्षा कमी महागाई राहिल्याची आकडेवारी गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. भारतीय बाजारांसोबतच जगभरातील अन्य देशांमधील मुख्य बाजारांच्या निर्देशांकांनीही नवा विक्रम नोंदवला आहे.