एचसीएल टेक, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सलग तिसऱया दिवशी सेन्सेक्स तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात बीएसई सेन्सेक्स 221 अंकांनी तेजीत राहिला. यासोबतच मजबूत कामगिरीसह सेन्सेक्सने 60,500 अंकांचा टप्पा प्राप्त केला आहे. दिग्गज समभागांपैकी आयटी आणि वित्तीय समभागांमधील लिलावचा फायदा भारतीय बाजाराला झाला आहे.
मंगळवारच्या सत्रात प्रारंभाच्या दरम्यान बाजारात चढउताराचे वातावरण राहिले होते, सोबतच काही काळ सेन्सेक्सने 60,689.25 चा उच्चांकी टप्पा गाठला होता. अंतिम क्षणी बाजार बंद होताना मात्र सेन्सेक्स 221.26 अंकांनी वधारुन निर्देशांक 60,616.89 अंकांवर बंद झाल्याचे दिसून आले आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 52.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 18,055.75 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा आणि स्टेट बँक यांचे समभाग दिवसभरातील कामगिरीमध्ये 4.3 टक्क्यांनी लाभात राहिले आहेत. अन्य कंपन्यांपैकी टाटा स्टील, बजाज फायनान्स, आयटीसी, एशियन पेन्ट्स आणि कोटक बँक यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले आहेत.
प्रमुख क्षेत्राची सकारात्मक स्थिती
मंगळवारच्या सत्रात करण्यात आलेल्या कामगिरीत विशेषकरुन आर्थिक क्षेत्रात स्थिती सकारात्मक राहिली होती. यामध्ये प्रमुख बँका, आयटी, धातू, दूरसंचार आणि तेल व गॅस कंपन्यांसोबत वित्तीय क्षेत्रातील अन्य कामगिरीचा प्रभाव बाजारावर राहिल्याचे दिसले. आशियातील बाजारात विक्रीचा कल राहिला होता. तसेच चीनमध्ये ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे शेअर बाजारात विक्री राहिली. विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या सोमवारच्या गुंतवणुकीमध्ये भांडवली बाजारात झालेली विक्री आणि त्यामुळे जवळपास 124.23 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री झाल्याची नेंद आहे.