एनटीपीसी, पॉवरग्रिड, एसबीआयसह टायटन मजबुतीमध्ये
वृत्तसंस्था/ मुंबई
नवीन वर्षाच्या प्रारंभानंतर भारतीय भांडवली बाजारात सलगच्या सकारात्मक स्थितीसह चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी सेन्सेक्स मजबूत कामगिरीसह बंद झाला आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर 673 अंकांवर झेप घेतली असून दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17,800 अंकांवर जात बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या स्थितीसोबत बीएसई सेन्सेक्स 672.71 अंकांच्या मजबूतीसह 59,855.93 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 179.55 अंकांसोबत 17,805.25 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी दिवसभर एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, स्टेट बँक, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग भक्कम स्थितीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक आणि डॉ.रेड्डीज लॅब यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
बाजार तज्ञांच्या नजरेतून
अमेरिकन शेअर बजाराने नवीन वर्षातील पहिल्या दिवशीच विक्रमी कामगिरी केल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय भांडवली बाजारात राहिला आहे. यासह विदेशी संस्थांकडून गुंतवणूक करण्यात आल्यामुळे प्रमुख बँकांमध्ये लिलावाचा कल राहिल्याचे दिसून आले. कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या चिंतेचे कारण अभ्यासकांनी व्यक्त केलेले नाही. यामुळे आर्थिक घडामोडींवर त्याचा प्रभाव पडण्याची शंका व्यक्त केली जात नसल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
जागतिक बाजारांची स्थिती कोरोना विषाणूचे नवे स्वरुप ओमिक्रॉनने चिंता निर्माण केली असल्याने आशियातील अन्य बाजारात मिळताजुळता कल राहिला होता. तसेच याचदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.27 टक्क्यांनी मजबूत होताना दिसले. बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून सोमवारी करण्यात आलेल्या गुंतवणुकीमुळे शुद्ध 575.39 कोटी रुपये किमतीच्या समभागांची खरेदी झाली आहे.