रिलायन्स 6 टक्क्यांनी तेजीत : चौथ्या सत्रात मजबूत स्थिती
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारामध्ये चालू आठवडय़ात गुरुवारी चौथ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स तब्बल 454 अंकांच्या उसळीसोबत बंद झाला आहे. जागतिक बाजारांमध्ये गुरुवारी सकारात्मक स्थिती राहिल्यामुळे या दरम्यान भारतीय बाजाराचा निर्देशांक मजबूत होत बंद झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीचे समभाग तेजीत राहिल्याने बाजार सावरला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने भारतीय बाजारात सेन्सेक्स दिवसअखेर 454.10 अंकांनी मजबूत होत 58,795.09 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 121.20 अंकांनी वधारुन 17,536.25 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज सहा टक्क्यांपेक्षा अधिकने तेजीत राहिला आहे. यासह आयटीसी, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टायटन, भारतीय एअरटेल आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग तेजीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये प्रामुख्याने आशियातील हाँगकाँगचा हँगसेंग आणि जपानचा निक्की हे तेजीत राहिले असून चीनचा शांघाय व दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे नुकसानीसह बंद झाले आहेत. युरोपच्या बाजारात मात्र दुपारपर्यंत सकारात्मक कल राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.38 टक्क्यांनी घसरुन 81.94 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहे.
अभ्यासकांच्या नजरेतून
देशातील बाजारात सुरुवातीच्या काळात मिळता जुळता कल राहिला होता. कारण युरोपमधील कोविडसह बँक ऑफ दक्षिण कोरियाचा व्याजदर वाढणे या घटनांचा परिणाम देशातील बाजारात राहिला होता. यामुळे दुपारनंतर बाजारात तेजी परतली. दुसरीकडे भारताचा आर्थिक वृद्धीदर मजबूत राहणार असल्याचे संकेत मूडीज या रेटिंग संस्थेकडून नोंदवले असल्याने या बातमीचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स व निफ्टीवर झाला असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2494
- आयटीसी……. 231
- इन्फोसिस…. 1722
- टेक महिंद्रा… 1558
- कोटक महिंद्रा 2035
- टायटन…….. 2398
- भारती एअरटेल 764
- सन फार्मा…… 783
- पॉवरग्रिड कॉर्प 204
- नेस्ले………. 19204
- एचसीएल टेक 1124
- एचडीएफसी बँक 1524
- अल्ट्राटेक सिमेंट 7595
- टीसीएस…… 3445
- अपोलो हॉस्पिटल 5739
- टारंटो फार्मा. 2976
- पीआय इंडस्ट्रीज 2997
- डिव्हीस लॅब. 4789
- बंधन बँक……. 314
- मदरसन सुमी.. 231
- अरोबिंदो फार्मा 669
- हॅवेल्स इंडिया 1393
- ग्रासिम…….. 1766
- सिप्ला……….. 899
- मॅरिको……….. 550
- डाबर इंडिया.. 605
- ल्यूपिन………. 898
- अदानी एन्टरप्राईजेस 1763
- डीएलएफ…… 407
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक.. 959
- मारुती सुझुकी 7569
- आयसीआयसीआय 750
- हिंदुस्थान युनि 2349
- ऍक्सिस बँक…. 680
- बजाज ऑटो.. 3390
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1849
- स्टेट बँक……… 490
- बजाज फिनसर्व्ह 17354
- एशियन पेन्ट्स 3143
- बजाज फायनान्स 7131
- टाटा स्टील… 1173
- एचडीएफसी. 2870
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 890
- डॉ.रेड्डीज लॅब 4592
- एनटीपीसी….. 135