रिलायन्स, एचडीएफसीचे समभाग नुकसानीत- निफ्टी 15,686 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी अखेर सेन्सेक्सच्या तेजीला पूर्ण विराम मिळाला आहे. यामध्ये सेन्सेक्समध्ये जवळपास 283 अंकांची घसरण झाली आहे. दुसऱया बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसीचे समभाग प्रमुख घसरणीत राहिले होते.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीसोबत दिवसअखेर सेन्सेक्स 282.63 अंकांसह 0.54 टक्क्यांच्या घसरणीसोबत निर्देशांक 52,306.08 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85.80 अंकांसोबत 0.54 टक्क्यांची घसरण प्राप्त करत निर्देशांक 15,686.95 वर बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांपैकी कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक 1 टक्क्यांच्या नुकसानीसोबत बंद झाले आहेत.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक प्रभावीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो, टाटा स्टील, एचडीएफसी, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मारुती सुझुकी, टायटन, बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांच्यासह अन्य समभाग लाभात राहिले आहेत.
जागतिक पातळीवरील मुख्य घडामोडींमध्ये आशियातील बाजारांपैकी, शांघाय, हाँगकाँग आणि टोकीयो लाभात राहिले असून सोलचा बाजार मात्र घसरणीसोबत बंद झाला आहे. युरोपमधील प्रमुख शेअर बाजारात घसरणीचा कल राहिला होता. आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूड तेल 0.84 टक्क्यांनी मजबूत होत 75.44 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
देशात लसीकरण मोहिमेने पकडलेली तेजी, निवडक राज्यांमध्ये मागे घेतलेले लॉकडाऊन व केंद्र सरकारकडून अडचणीचा सामना करणाऱया उद्योगांना देण्यात येणाऱया आर्थिक मदतीच्या संकेतामुळे येत्या काळात बाजारातील चित्र बदलाचा अंदाज शेअर बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.