ऑनलाईन टीम / मुंबई :
आज आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. जागतिक बाजारपेठेतील घसरणीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला असून, बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स 3.4 लाख कोटी रुपयांनी घसरून 202.80 लाख कोटी रुपयांवर आले आहेत. गुरुवारी ते 206.18 लाख कोटी रुपयांवर होते.
बीएसई सेन्सेक्स 1759.04 अंकांनी घसरून49266.38 अंकांवर सुरू सुरू आहे. एनएसईचा निफ्टी 518.05 अंकांनी घसरून14,579.30 अंशांवर स्थिरावला आहे.