जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेताचा प्रभाव
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारी जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणामुळे बीएसई सेन्सेक्स व निफ्टी घसरणीसह बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई 581.21 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 57,276.94 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 167.80 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,110.15 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील समभागांपैकी एचसीएल टेकचे समभाग चार टक्क्यांपेक्षा अधिकने नुकसानीत राहिले होते. यासोबतच टेक महिंद्रा, डॉ.रेड्डीज लॅब, विप्रो, टीसीएस, टायटन आणि इन्फोसिस यांचे प्रमुख समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला लाभात राहिलेल्या कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, स्टेट बँक, मारुती सुझुकी आणि कोटक बँक यांच्या समभागांचा समावेश राहिला आहे.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदर वाढविण्यासोबत सुतोवाच केले होते. यासह अन्य घडामोडींमुळे झालेल्या वातावरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशांमधून विदेशी भांडवल काढून घेण्याकडे कल राहिला होता.
जागतिक बाजाराची स्थिती
आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनमधील शांघाय कम्पोजिट निर्देशांक, हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे नुकसानीत राहिले आहेत. युरोपीयन प्रमुख बाजारांमध्ये दुपारी घसरण थांबली होती. आंतरराष्ट्रीय बाजार कच्चे तेल 0.16 टक्क्यांनी घसरलेले दिसले. ते एकावेळी 89.82 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी 7,094.48 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- ऍक्सिस बँक…….. 773
- स्टेट बँक…………. 529
- मारुती सुझुकी… 8817
- कोटक महिंद्रा…. 1889
- सन फार्मा………. 812
- इंडसइंड बँक……. 888
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 857
- आयटीसी……….. 214
- अल्ट्राटेक सिमेंट. 7104
- फेडरल बँक……… 100
- वेदान्ता………….. 328
- सिप्ला…………… 927
- पेट्रोनेट एलएनजी 212
- अशोक लेलँड……. 131
समभाग घसलेल्या कंपन्या
- एचसीएल टेक… 1077
- टेक महिंद्रा……. 1445
- डॉ.रेड्डीज लॅब… 4256
- विप्रो…………….. 544
- टीसीएस………. 3650
- टायटन………… 2310
- इन्फोसिस…….. 1685
- नेस्ले………….. 18416
- पॉवरग्रिड कॉर्प…. 214
- टाटा स्टील……. 1088
- बजाज फायनान्स 6855
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2338
- हिंदुस्थान युनि.. 2298
- बजाज फिनसर्व्ह 15364
- एचडीएफसी….. 2503
- आयसीआयसीआय 794
- एशियन पेन्ट्स. 3120
- एचडीएफसी बँक 1476
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1911
- भारती एअरटेल… 707
- एनटीपीसी……… 134
- ज्युबिलंट फूड…. 3243
- एसआरएफ……. 2348
- अपोलो हॉस्पिटल 4293
- हॅवल्स इंडिया… 1145
- डिव्हीस लॅब….. 3941
- पीआय इंडस्ट्रीज 2371