एअरटेल, नेस्लेसह टीसीएस तेजीत : जागतिक बाजारात नकारात्मकता
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चौथ्या सत्रात गुरुवारी जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे सेन्सेक्स व निफ्टी हलक्या तेजीसोबत दोन्ही निर्देशांक बंद झाले आहेत. दिवसभरातील कामगिरीनंतर भारती एअरटेल, नेस्ले इंडिया तसेच टीसीएसचे समभाग तेजीत राहिले आहेत.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीतून गुरुवारी सेन्सेक्स 58.81 अंकांनी वधारुन निर्देशांक 58,305.07 वर बंद झाला आहे. बंद होतानाही सेन्सेक्सने नवा विक्रम नेंदवला असल्याचे पहावयास मिळाले आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 15.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,369.25 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासह नेस्ले इंडिया, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक तसेच आयटीसी या कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक तसेच ऍक्सिस बँक यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या प्रभावामुळे जागतिक बाजाराने जोखीम घेणे बंद केले असल्याचे दिसून आले. यामुळे भारतीय बाजाराची वाटचाल ही घसरणीत राहिल्याची नेंद करण्यात आली होती. मोठय़ा कंपन्यांच्या लार्जकॅप समभागात काही करेक्शन येण्याची शक्यता आहे. यामुळे सदर समभागांनी चालू वर्षात तेजीसाठी मुख्य योगदान दिल्याचे मत काही अभ्यासकांनी नमूद केले आहे.
अन्य प्रमुख बाजारांमध्ये आशियातील बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे नुकसानीत राहिले आहेत. तर चीनचा शांघाय कम्पोजिट हे नफा कमाईत राहिले होते.
सण-उत्सवाचा कालावधी सुरु असल्याने गुंतवणूकदारांचा कल गुंतवणुकीकडे राहणार असल्याचा अंदाज अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. परिणामी, शेअरबाजार तेजीत राहील.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल 686
- नेस्ले………. 20351
- टाटा स्टील… 1447
- बजाज फिनसर्व्ह 16743
- एचसीएल टेक 1198
- आयटीसी……. 212
- एनटीपीसी….. 114
- टीसीएस…… 3791
- एशियन पेन्ट्स 3346
- टेक महिंद्रा… 1433
- पॉवरग्रिड कॉर्प 173
- हिंदुस्थान युनि 2807
- मारुती सुझुकी 6802
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1669
- स्टेट बँक……… 432
- इंडसइंड बँक… 999
- एचडीएफसी. 2829
- मॅरिको……….. 574
- कोलगेट……. 1734
- हिंडाल्को…….. 463
- हॅवेल्स इंडिया 1453
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टायटन…….. 2037
- अल्ट्राटेक सिमेंट 7928
- Þ बजाज ऑटो.. 3699
- एचडीएफसी बँक 1567
- ऍक्सिस बँक…. 790
- बजाज फायनान्स 7421
- महिंद्रा ऍण्ड महिंदा 750
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2425
- सन फार्मा…… 776
- इन्फोसिस…. 1691
- आयसीआयसीआय 720
- डॉ.रेड्डीज लॅब 4910
- एसबीआय लाईफ 1172
- अपोलो हॉस्पिटल 4723
- बंधन बँक……. 283
- बायोकॉन……. 352
- डाबर इंडिया.. 638
- टाटा पॉवर….. 132
- सिप्ला……….. 949
- टारंटो फार्मा. 3090
- अरोबिंदो फार्मा 741