सेन्सेक्स 272 अंकांनी वधारला : भारती एअरटेल नफ्यात
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ाचा प्रारंभ सोमवारी घसरणीसोबत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु दुसऱयाच दिवशी मंगळवारी गमावलेली तेजी पुन्हा मिळवत सेन्सेक्स निफ्टी दोन्ही तेजीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये दिवसभरातील प्रमुख घडामोडींमध्ये एजीआर प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सकारात्मक प्रभाव बाजारात राहिला होता. यामुळे भारती एअरटेलचे समभाग 7 टक्क्मयांनी आणि व्होडाफोन आयडीयाचे समभाग 12 टक्क्मयांनी नफ्यात होते.
प्रमुख कंपन्यांच्या जोरावर बीएसई सेन्सेक्स 272.51 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,900.80 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82.75 अंकांनी वाढून 11,470.25 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे.
या कामगिरीच्या विरुद्ध स्थिती सोमवारी बाजारात राहिली होती. यामध्ये सेन्सेक्स 421 अंकांच्यावर आणि निफ्टी 122 अंकावर उघडला होता. परंतु पूर्व लडाखमधील चीनच्या सैन्याच्या वाढणाऱया हालचालीमुळे बाजारात विक्रीचा जोर मोठय़ा प्रमाणात वाढत गेल्याने शेअर बाजार कोसळून बंद झाला होता.
दुसऱया दिवशी मंगळवारी दिग्गज कंपन्यांमध्ये प्रामुख्याने भारती एअटेलचे समभाग सर्वाधिक 7.11 टक्क्मयांनी वधारले आहेत. तर सोबत जेएसडब्लू स्टील 6.41, हिंडाल्को 5.26, एशियन पेन्ट्स 4.30 आणि बजाज फायनान्सचे समभाग 4.28 टक्क्मयांनी नफ्यात राहिले आहेत. दुसऱया बाजूला इन्फ्राटेल 5.11, ओएनजीसी 2.99, ऍक्सिस बँक 1.72, अदानी पोर्ट 1.64 आणि इन्फोसिसचे समभाग 1.37 टक्क्मयांची घसरण नोंदवत बंद झाले आहेत.
जगभरातील बाजार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सोमवारी जगभरातील बाजारांमध्ये घरसणीचे वातावरण राहिले होते. परंतु दुसऱया दिवशी अमेरिकी बाजार नॅसडॅकमध्ये तेजी राहिली होती. तर दुसरीकडे एसऍण्डपी घसरणीसह बंद झाला आहे. चीनचा बाजार तेजीसह बंद झाला परंतु इटली, जर्मनी आणि फ्रान्सचे बाजार घसरणीसह बंद झाले आहेत.