ऑनलाईन टीम / मुंबई :
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने सेन्सेक्स 1011 अंकांनी कोसळला. तर निफटीमध्येही 280 रुपयांची घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स सध्या 30636 तर निफ्टी 8981 अंकांवर स्थिरावला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. त्यातच जागतिक बाजारात असलेल्या अस्थिरतेमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.सोमवारी मुंबई शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध एकूण कंपन्यांचे भाग भांडवल 1,23,72,581.25 कोटी रुपये होते, ते आज 3,97,028 कोटीरुपयांनी घसरून 1,19,75,553.68 कोटी रुपयांवर स्थिरावले आहे.