अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम
ऑनलाईन टीम / मुंबई :
अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला.
शेअर बाजार सध्या 40 हजार 850 अंकांवर आला आहे. तर निफ्टीतही 195 अंकांची पडझड झाली आहे. निफ्टी सध्या 12030 अंकावर आला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणवाने मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खनिज तेलांच्याही किंमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. आशियातील सिंगापूर आणि जपानमधील बाजारात नकारात्मक सुरुवात झाली.
शेअर बाजार कोसळल्यामुळे रुपयाचेही अवमुल्यन झाले आहे. रिलायन्स, एचडीएफसी बँक, मारुती, एसबीआय, एशियन पेंट पॉवरग्रीड यांचे शेअर्स घसरले आहेत.