सदरच्या यादीमध्ये 25 जणांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजारातील नियामक सेबी (SEBI) यांनी गुरुवारी जवळपास 25 डिफॉल्टर्सची (Defaulters) यादी सादर केली आहे. सदरच्या यादीमध्ये ज्यांनी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केलेले नाहीत किंवा आकारलेला दंडही भरलेला नाही अशांचा समावेश यामध्ये आहे.
सेबीला यांची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात सेबीने आपल्या वेबसाईटवर माहिती दिली आहे, की डिफॉल्डटर्सच्या संपर्कापासून सेबी लांब राहिली होती. सेबीने म्हटले आहे की, त्यांच्या वसूली अधिकाऱयांनी या व्यक्तींच्या विरोधात वसूलीचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र यांना नेंदणी करण्यात आलेल्या पत्यावर नोटीस देण्यात आली नव्हती. यामध्ये वसूली नोटिस जुलै 2014 पासून जानेवारी 2022 दरम्यान देण्यात आली होते. यासंबंधीत कोणाला माहिती असल्यास त्यांनी ईमेल किंवा पत्राच्या आधारे 24 मार्च 2022पर्यंत संपर्क करून माहिती सेबीकडे सादर करायची आहे.
यादीमध्ये कोणकोण आहे?
सेबीकडून सादर करण्यात आलेल्या यादीमध्ये प्रामुख्याने पुढील नावांचा समावेश आहे. कन्हैयालाल जोशी, संतोष कृष्ण पवार, चेतन मेहता, मुकुंद यदु जांभळे, अंकित के अग्रवाल, जयेश शाह, सुरेशकुमार पी जैन, प्रवीण वशिष्ठ, राजेश तुकाराम डाम्बरे, जयेश कुमार शाह, दयाभाई पटेल, दलसुखभाई पटेल, विठ्ठलभाई गाजेरा आदी नावांचा समावेश आहे.