मुंबई
बाजारातील नियामक सेबीने दोन कंपन्यांना भारतीय बाजारामध्ये आयपीओ सादर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. कृषी रसायन बनवणारी कंपनी इंडिया पेस्टिसाइड्स आणि आरोग्य क्षेत्रातील कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स यांना आयपीओ सादर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांनी आयपीओसाठी फेब्रुवारीमध्ये अर्ज दाखल केला होता. यापैकी इंडिया पेस्टीसाईडस्ला आयपीओच्या माध्यमातून 800 कोटी रुपये उभे करायचे आहेत. आयपीओसाठी 100 कोटी रुपयांचे ताजे समभाग कंपनी जारी करणार आहे तर दुसरीकडे आंध्रप्रदेशमधील सर्वात मोठी कंपनी कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स आयपीओच्या माध्यमातून 200 कोटी रुपये उभे करणार आहे.