वृत्तसंस्था/ पॅरमा (इटली)
एटीपी टूरवरील शनिवारी येथे झालेल्या पॅरमा आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या 20 वर्षीय सेबॅस्टियन कोर्दाने एकेरीचे जेतेपद मिळविताना इटलीच्या सिचेंटोचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्या सेबॅस्टियन कोर्दाने इटलीच्या मॉको सिचेंटोचा 6-2, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. सेबेस्टियन हा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम विजेता पेत्र कोर्दाचा चिरंजीव आहे. एटीपी टूरवरील स्पर्धेतील सेबॅस्टियन कोर्दाचे हे पहिले विजेतेपद आहे.