वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत गुरुवारी अमेरिकेची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सने आपली मोठी बहीण व्हिसनचा दुसऱया फेरीत पराभव केला.
आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्मयपदे मिळविणाऱया सेरेनाने दुसऱया फेरीतील सामन्यात व्हिनस विलियम्सचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. या दोन बहिणींमध्ये गेल्या 22 वर्षांच्या कालावधीत 31 सामने झाले असून सेरेनाने 19 तर व्हिनसने 12 सामने जिंकले आहेत. गुरुवारच्या सामन्यात सेरेनाने बेसलाईन खेळावर अधिक भर देत व्हिनसचे आव्हान संपुष्टात आणत या स्पर्धेची उपांत्यपूर्वफेरी गाठली आहे. सेरेनाचे वय 38 असून व्हिनस 40 वर्षांची आहे. स्वीसच्या जिल टेकमनने कझाकस्तानच्या पुतिनसेव्हाचा 6-2, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.