मुंबई
पोलाद क्षेत्रात कार्यरत असणाऱया सरकारी पोलाद कंपनी सेलच्या ऑगस्टमधील स्टील विक्रीत 35 टक्के इतकी समाधानकारक वाढ झाली असल्याचे समजते. कंपनीने ऑगस्टमध्ये 14.32 लाख टन पोलादाची विक्री स्थानिक बाजारात केली असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर कंपनीची ऑगस्टमधील निर्यात 250 टक्क्यांनी वाढून 1.94 लाख टन इतकी झाली आहे. रोख रक्कम आवकेत वाढ झाल्याने कंपनीच्या डोक्यावरील कर्जाचा भार बऱयापैकी कमी होण्यास मदत होणार असल्याचे कंपनीने सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी विक्रीवर परिणाम झाला होता. पण अनलॉकनंतर नियमात शिथिलता देण्यात आल्यानंतर बांधकाम क्षेत्रासह विविध उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे पोलादाची मागणी पूर्ववत होताना दिसते आहे. येणाऱया काळात विक्रीत वाढीसाठी प्रयत्न करताना कंपनी निर्यात वाढीवरही अधिकाधिक लक्ष केंद्राrत केलं जाणार आहे.