एकमेकांच्या प्रेमात पडून आयुष्याचे जोडीदार झालेल्या सेलिब्रिटी कपल्सना गेल्या काही दिवसांपासून प्रेमाचा दिवस साजरा करण्याचे वेध लागले होते. आजच्या व्हॅलेंटाईन-डे साठी या कपल्सनी खास प्लॅन केले असून लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन-डे साजरा करण्यात या जोडय़ा रंगल्या आहेत. कतरिना कैफ आणि विक्की कौशल या दोघांनी गेल्या वषी 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये थाटामाटात लग्न केले. लुका छुपी 2 च्या शूटिंगसाठी विक्की इंदूरमध्ये आहे, तर आता कतरिना देखील दिल्लीत सलमान खानसोबत टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यातूनही विकी कतरिनाला भेटण्यासाठी दिल्लीला गेला आणि तिथे व्हॅलेंटाईन-डे साजरा करणार आहे.
मौनी रॉयने या वषी 27 जानेवारीला बॉयप्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केले. दोघे सध्या काश्मीरमध्ये त्यांचा हनिमून एन्जॉय करत आहेत आणि लग्नानंतर पहिला व्हॅलेंटाईन-डे साजरा करण्यासाठी त्यांनी हनिमूनचा मुक्कामही वाढवला आहे. अंकिता लोखंडेनेही तिचा प्रियकर विक्की जैनसोबत गेल्या वषी डिसेंबरमध्ये लग्न केले होते. लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन -डे हे दोघे साजरा करण्यासाठी एका खास डेस्टीनेशनला पोहोचले आहेत. अभिनेता राजकुमार रावने 11 वर्षांच्या डेटिंगनंतर मैत्रीण पत्रलेखाशी लग्न केले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हा पहिला व्हॅलेंटाईन-डे साजरा करणार असून यामध्ये राजकुमारने बायकोसाठी सरप्राईज प्लॅन केलाय. यामीने गेल्या वषी 4 जून रोजी चित्रपट दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले. दोघांनी सोशल मीडियाततून चाहत्यांना लग्नाची माहिती दिली होती. प्रेम आणि मैत्रीचा हा प्रवास लग्नापर्यंत आला. पहिला प्रेमाचा दिवस या दोघांनी समुद्र किनाऱयावर साजरा करायचे ठरवले आहे.