कोरोना नियंत्रणासाठी ब्रिटनमध्ये सातत्याने लॉकडाऊनचा आधार घेतला गेल्याने त्या देशातील सेवा क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे पब्ज, हॉटेले आणि इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत सेवाक्षेत्राची साधारणतः 4 टक्के घसरण होऊन निर्देशांक 45.8 टक्के झाला आहे.
गेल्या महिन्यात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सेवा क्षेत्राचा निर्देशांक समाधानकारकरित्या वाढला होता. तथापि दुसऱया लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लावाला लागल्याने आर्थिक परिस्थिती ढासळली असे सांगण्यात येत आहे.