प्रतिनिधी /बेळगाव
सेव्हेंटीन टेकर्स बेळगाव या साहसी ग्रुपने ठाकचा भैरी, गोरक्षगड, भैरवगड, जीवधनगडमार्गे वादरलिंगी सुळक्मयाची तीन दिवस चढाई-उतराई मोहीम नुकतीच पूर्ण केली. बेळगावच्या तरुणांनी पहिल्यांदाच अशा प्रकारची चढाई केली आहे.
श्रीनाथ पवार, प्रियेश गौंडाडकर, सुशांत खांडेकर, उमेश कणबरकर, राजू शेट्टी, विनायक शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
ठाक गुहेमधील ठाकरांचा देव, ठाकच्या भैरीचे पूजन निखिल पाटील, ओंकार मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. पदभ्रमंती गोरक्षगडावर पोहोचल्यानंतर नवनाथ पंथापैकी दुसरे गोरक्षनाथांच्या समाधीचे पूजन ऋषभ मोहिते, सौरभ बामणे, किसन खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भैरवगड, नानेघाट, जीवधन असा प्रवास करण्यात आला.
बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच अजस्त्र असा वादरलिंगी सुळका सलग पाच तासांच्या चढाईनंतर दोरीच्या साहाय्याने रॅपलिंग करण्यात आले. बेळगावमधील 80 युवकांनी जीवधन ते वादरलिंग असे 300 फूट अंतर पार करून भगवा ध्वज फडकविण्यात आला. 900 मीटर उंच सुळक्मयावर जिजाऊंची 424 वी जयंती साजरी करण्यात आली.