ऑनलाईन टीम / लेह :
लडाखमधील भारत-चीन सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अचानक लेह-लडाखमध्ये दाखल झाले.
लडाखच्या निमू भागात मोदींनी लष्कर, वायूदल आणि आयटीबिपीच्याच्या जवानांशी संपर्क साधला. त्यावेळी मोदींनी तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेतला. चीनने यापुढे कोणतेही पाऊल उचलल्यास भारत मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशाराच मोदींनी या दौऱ्यातून चीनला दिला आहे.
थोड्याच वेळात मोदी गलवान खोऱ्यातील जखमी जवानांची भेट घेणार आहेत. मोदींसोबत भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत उपस्थित आहेत.