प्रतिनिधी/ बेळगाव
माजी सैनिक संघटना बेळगाव, जिल्हा बेळगाव तर्फे सैनिक परीक्षेची पूर्वतयारी मार्गदर्शन वर्ग सुटीच्या दिवसाखेरीज रोज सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सुरू आहेत. हे वर्ग ऑक्ट्रॉय नाका (शौर्य चौक) गणेशपूर रोड, कॅम्प बेळगाव येथे सुरू आहेत.
भू दल, नावीकदल, हवाईदल, बी. एस. एफ., सी. आर. पी. एफ., आसाम रायफल्स, आय. टी. बी. पी., सी. आय. एस. एफ. आदी तसेच सर्व दलातील सामान्य सैनिक, क्लिरीकल, टेक्निकल, नर्सिंग असिस्टंट, टेडसमन, आदी पदांकरीता लेखी परीक्षा, बेसीक कंम्प्युटर स्कील (बीसीएस) आणि इंग्लीश स्पिकिंग कोर्स चालविले जातात. परीक्षेची शिकवण अनुभवी टिचर यांच्याकडून मार्गदर्शन दिले जाते. तसेच ऑनलाईन ई. सी. एच. एस. अर्ज, ऑनलाईन भर्ती अर्ज ऑनलाईन नोकरी अर्ज केले जातात.
कंम्प्युटरचे कोर्सेस जवानांच्या पत्नी तसेच वीरनारी तसेच इतर सामान्यांना देखील चालविले जातात. इच्छुक विद्यार्थी, विद्यार्थीनींनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार कृष्णा नौकुडकर यांनी केले आहे.