वन अधिकारी घटनास्थळी दाखल
प्रतिनिधी / सातारा
साताऱ्यात सैनिक स्कूल आणि पिरवाडी परिसरामध्ये दुर्मिळ असलेला ब्लॅक पँथर परिसरातील नागरिकांना दर्शन झाल्याने परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पँथरला शोधण्यासाठी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
वन कर्मचाऱ्यांनी येथील असलेल्या झाडाला ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला असून वनविभाग या ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून ब्लॅक पँथरचा शोध घेणार आहेत. यावेळी वन विभागाचे वनरक्षक सुहास भोसले, प्रकाश पडवळकर, राजकुमार मोसलगी यांनी सर्व घटनेचा पंचनामा केला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत.