वृत्तसंस्था/ देहरादून
देहरादून येथील इंडियन मिलिट्री अकॅडमीमध्ये शनिवारी पासिंग आउट परेड पार पडला आहे. पासिंग आउट परेडमध्ये 425 कॅड्टेस सामील झाले. या कॅडेट्समध्ये 9 मित्रदेशाचे 84 कॅडेट्स देखील सामील होते. सैन्याच्या वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल आर.पी. सिंग यांनी परेडकडून मानवंदना स्वीकारली. कोरोना महामारीमुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदा देखील कॅड्ट्से कुटुंबीय पासिंग आउट परेडमध्ये सामील होऊ शकले नाहीत.
खराब हवामानामुळे आयएमए पासिंग आउट परेड सुमारे 2 तास विलंबाने सुरू झाली. पासिंग आउट परेडनंतर शपथग्रहण सोहळा पार पडला आहे. आयएमएमधून पास झालेले 425 कॅडेट्स देशासह विदेशी सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू होणार आहेत. यातील 431 कॅडेट्स युवा अधिकारी म्हणून भारतीय सैन्याचा हिस्सा होतील.
तर अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, भूतान, मॉरिशस, श्रीलंका, व्हिएतनाम, टोंगा, मालदीव्स आाणि किर्गिस्तानचे 84 कॅडेट्स स्वतःच्या देशाच्या सैन्यामध्ये सामील होणार आहेत. इंडियन मिलिट्री अकॅडमीतून आतापर्यंत 63,381 सैन्य अधिकारी मिळाले आहेत. यातील 2,656 अधिकारी 9 मित्र देशांमध्ये कार्यरत आहेत.
स्वॉर्ड ऑफ ऑनर
कॅडेट मुकेश कुमारला स्वॉर्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला. दीपक सिंगला सुवर्ण, मुकेश कुमारला रजत तर लवनीत सिंगला कांस्य पदक मिळाले आहे. किन्ले नोरबू याची सर्वोत्कृष्ट विदेशी कॅडेट म्हणून निवड झाली आहे. चीफ ऑफ आर्मी स्टॉफ बॅनर डोगराई कंपनीला मिळाला आहे.