मुंबई
जपानच्या सॉफ्टबँकेकडून बँकिंग तंत्रज्ञान स्टार्टअप जेटामध्ये 25 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या गुंतवणुकीच्या मदतीने कंपनीच्या जागतिक विस्ताराला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संकेत आहेत.
फ्रान्सची सुविधा कंपनी सोडेक्सोने सध्याच्या स्थितीमध्ये कंपनीमध्ये एक कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ओला, पेटीएम, डिलिव्हरी आणि फ्लिपकार्ट यासारख्या भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. सॉफ्टबँकेचा जेटामध्ये 17.25 टक्क्यांचा वाटा असल्याचे सांगितले आहे.
यासोबतच पश्चिम आशिया, दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण अमेरिका आणि आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये मजबूत कामगिरी करण्यावर भर देण्यासाठी कंपनी येत्या काळात काम करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.