वार्ताहर/ कोरेगाव
16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची अमानुष घटना चार महिन्यांनंतर उघडकीस आली. या प्रकरणी सोनके येथील आरोपी हिंदुराव मारुती धुमाळ याच्या विरोधात वाठार पोलिसात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनके (ता.कोरेगाव) येथील पीडित मुलगी अल्पवयीन असून गुडीपाडव्याच्या एक दिवस अगोदर आरोपी हिंदुराव धुमाळ याने दुपारच्या दुपारी दोनच्या सुमारास सदर पीडित मुलगी तिच्या आजीकडे जात असताना घरी बोलावून बळजबरीने बलात्कार केला त्यानंतर पून्हा गुढीपाडव्याच्या दुस्रया दिवशीहि दमदाटी व बळजबरी करीत बलात्कार केला यामध्ये सदर मुलगी गरोदर राहिली चार महिन्यानंतर हि घटना उघडकीस आली याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने वाठार पोलीस ठाण्यात दिली. पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिकचा तपास सपोनि स्वप्नील घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम एस पाटील करीत आहेत.