शनिवारी सायंकाळी 6 पासून घेतला पेट, रविवारी दुपारपर्यंत अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी/ सातारा
दरवर्षी उन्हाळय़ात सोनगाव कचरा डेपोत आगीच्या घटना घडत असतात. पालिका दरवर्षी लागलेल्या कचरा डेपोतील आगी आटोक्यात आणत असते. शनिवारी सायंकाळी 6 वाजता सोनगाव कचरा डेपोत सोनगावच्या बाजूच्या गेटजवळ कचऱयाने पेट घेतला होता. त्या आगीचा भडका रात्री मोठा झाला. रात्रभर कचऱयाने पेट घेतल्याने या परिसरात धुराचे लोट पहायला मिळत होते. सकाळी जेव्हा याची माहिती पालिका प्रशासनाला मिळताच सकाळपासून अग्निशामक दलाचे बंब ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. रविवारी दुपारपर्यंत तब्बल दहा बंब पाणी मारावे लागले.
सातारा शहरातून दररोज तयार होणारा सुमारे सहा टन कचरा हा सोनगाव कचर डेपोत टाकण्यात येतो. तसेच लगतच्या गावांचाही कचरा टाकला जातो. या कचऱयाला दरवर्षी आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. उन्हाळय़ात हे प्रकार घडतात. नुकताच उन्हाळा सुरु झाला असून उन्हाळय़ाच्या पहिल्याच आठवडय़ात शनिवारी सायंकाळी सोनगाव कचरा डेपोतल्या कचऱयाने पेट घेतला. सायंकाळी ही आग थोडीच होती. रात्री मात्र या आगीने रौद्ररुप धारण केले होते. कचरा चांगलाच पेटला होता. सकाळी जेव्हा पालिका प्रशासनाला याची माहिती मिळताच कचरा डेपोत कचऱयाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब बोलवण्यात आले. दुपारपर्यंत दहा गाडय़ा पाणी मारले. आग आटोक्यात आणण्याचे दुपारपर्यंत प्रयत्न सुरु होते. सोनगाव कचरा डेपोत प्रत्यक्ष आरोग्य विभागाचे अधिकारी सागर बडेकर हे गेले होते. त्यांनी अग्निशामक दलाच्या अधिकारी माने यांच्यासह कर्मचाऱयांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.