हजाराहून अधिक कचऱयासाठीचे प्लास्टिक डबे जळाले, दोन बेलिंग यंत्रे, ट्रान्सफॉर्मर व इतर वीज उपकरणांचेही नुकसान
प्रतिनिधी /मडगाव
सोनसडय़ावर शुक्रवारी लागलेल्या लागलेल्या आगीत हजाराहून अधिक कचऱयासाठीचे प्लास्टिक डबे जळून गेले आहेत तसेच वीज ट्रान्सफॉर्मर आणि इतर विद्युत उपकरणे, केबल्स आणि इतर उपकरणे नष्ट झाली. मडगाव पालिकेने तयार केलेला एकंदर हानीचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. या दुर्घटनेत झालेल्या नुकसानाचा आकडा 50 लाखांच्या पुढे जाऊ शकतो. याशिवाय, या आगीत दोन बेलिंग मशिन्स जळून गेली आहेत. अधिकारी म्हणतात की, या आगीत खराब झालेली ही यंत्रे दुरुस्तीच्या पलीकडे गेलेली असू शकतात.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिना लागणार
पालिकेच्या एका अधिकाऱयाने सांगितले की, झालेले नुकसान पाहिल्यास ट्रान्सफॉर्मर आणि इतर वीज उपकरणे मिळून सुमारे 40 लाख रुपयांपर्यंत नुकसानाचा आकडा पोहोचू शकतो. शुक्रवारच्या आगीत झालेल्या हानीचे मूल्यांकन करण्यासाठी सल्लागार नियुक्त केले आहेत. अंदाजे 40 लाख रुपयांचे प्राथमिक नुकसान झाले आहे असे सांगण्यात येत असून हा आकडा 50 लाखांच्या पलीकडे जाऊ शकतो. पालिकेच्या अधिकाऱयांना चिंतेत टाकणारी गोष्ट म्हणजे सोनसडा येथील शेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वीज नाही आणि या अधिकाऱयांच्या सांगण्यानुसार, ट्रान्सफॉर्मर आणि इतर विद्युत उपकरणे बसवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सुमारे एक महिना लागू शकतो.
प्लास्टिकचे डबे वापराविना जळाले
दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱयांनी कबूल केले आहे की, बेलिंग शेडजवळ साठवलेले एक हजाराहून अधिक प्लास्टिकचे लहान डबे जळून गेले आहेत. या घरगुती वापरासाठीच्या डब्यांचा पुरवठा जी-सुडाने जेव्हा मडगाव पालिकेने घरोघरी कचरा गोळा करण्यास सुरुवात केली होती तेव्हा केला होता. घरोघरी डबेवाटप करून झाल्यानंतर उर्वरित डबे जुन्या मार्केटमधील गॅरेजमध्ये उघडय़ावर टाकण्यात आले होते. लोकांनी त्यावर आवाज उठविल्यानंतर कोणाला चाहूल लागू न देता सोनसडय़ावर ते स्थलांतरित करण्यात आले होते. ज्यांच्या कचरापेटय़ा नादुरुस्त झाल्या त्या घरमालकांना हे डबे दिले असते, तर त्यांचा वापर झाला असता. मात्र पालिकेच्या आडमुठी धोरणामुळे ते शेवटी आगीत जळून गेले.
जुन्या मासळी मार्केटच्या ठिकाणी आजपासून तात्पुरते बेलिंग
सोनसडा यार्डातील आगीच्या घटनेनंतर सुक्मया कचऱयाचे संकलन थांबवणे पालिकेला भाग पडले आहे. सोनसडा येथील वीजपुरवठा खंडित झ?ाल्याने तसेच तो पूर्ववत सुरू करण्यास विलंब लागणार असल्याने सुक्मया कचऱयाचे बेलिंग पुन्हा सुरू करण्यासाठी पालिका इमारतीमागील जुन्या मासळी मार्केटच्या जागेत तात्पुरती सोय करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे साहाय्यक अभियंता विशांत नाईक यांनी दिली. दोनपैकी एक बेलिंग यंत्र सोमवारपासून पुन्हा कार्यान्वित होईल. याखेरीज घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे मडगाव येथील सुक्मया कचऱयावर वेर्णा येथील सुविधेत प्रक्रिया करण्यासाठी बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. सोनसडय़ावरील बेलिंग प्रक्रिया सध्या ठप्प झाली आहे. येथील ट्रान्सफॉर्मर व इतर विद्युत उपकरणे आगीत नष्ट झाली आहेत. ती पूर्ववत होण्यासाठी एक महिना लागेल किंवा ट्रान्सफॉर्मर स्थापित करणे आवश्यक असल्याने अतिरिक्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे आता पालिकेने सुक्या कचऱयाच्या बेकिंगला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून जुन्या मासळी बाजारात तात्पुरती प्रक्रिया सुरू होईल.