प्रतिनिधी / चंदगड
सोनारवाडी येथे गुरूवारी सकाळी ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रक्टरच्या इंजिनने पेट घेतल्याने भाजून गंभीर जखमी झालेल्या मारूती शंकर गुडूळकर (वय.55 रा. सोनारवाडी) या शेतकऱयाचा मृत्यू झाला तर अन्य चौघेजन जखमी झाले.
गुरूवारी सकाळी आठ वाजता आंबेहाळ या शेतातील गवत आणण्यासाठी ट्रक्टर जात असता एका वळणावर ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यावेळी ड्रायव्हर बाळू आप्पा गावडे (वय.42) शेजारी इंजिनवर बसलेले वैजू लक्ष्मण गुडूळकर, संतोष लक्ष्मण गुडूळकर, रमेश वैजू गुडळकर हे बाहेर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. तर मारूती गुडूळकर इंजिन खाली अडकले. त्याला उपचारासाठी नेत असता वाटेतच मृत्यू झाला. जखमीना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जनावारांसाठी वैरण आणण्यासाठी जाणाऱया शेतकऱयाचा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मारूतीच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतात काबाडकष्ट करून जीवन जगणाऱया मारूतीचा अपघाती मृत्यू झाल्याने सोनारवाडी परिसर हळहळ व्यक्त होत आहे.