मुंबई
सोनालिका ट्रक्टरची विक्री मे 2022 मध्ये तब्बल 42.1 टक्क्यांनी वाढून 12,615 वर पोहोचली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार होशियारपूरच्या ट्रक्टरचे उत्पादन घेणाऱया प्रकल्प कारखान्यातून मे 2021 मध्ये 8,878 इतके ट्रक्टर विक्री करण्यात आले. ट्रक्टर्सची मागणी वाढल्याने मागील महिन्यात ट्रक्टरची विक्री मजबूतपणे वाढली आहे.
सोनालिकांचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमन मित्तल यांनी म्हटले आहे, की ‘आम्ही 42.1 टक्के इतक्या विक्रमी आकडेवारीसह ट्रक्टरची विक्री करत मे महिन्यात 12 हजारपेक्षा अधिकचा टप्पा प्राप्त केला असून हा सर्वोच्च आकडा राहिला असल्याचे मित्तल यांनी नमूद केले आहे.’