नवी दिल्ली
सोनालिका टॅक्टर्सची जून महिन्यात एकूण ट्रक्टर्सची विक्री 47.8 टक्क्मयांनी वधारुन 15,200 च्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे. मागील वर्षातील समान महिन्यामध्ये 10,286 ट्रक्टर्सची विक्री झाली होती. यात देशातील विक्री मागील जून महिन्यात 8,827 युनिटच्या तुलनेत चालू वर्षातील या महिन्यात हा आकडा 13,691 राहिला आहे. म्हणजे यामध्ये साधारणपणे 55.1 टक्क्मयांची वृद्धी झाली आहे. विश्लेषकांच्या माहितीनुसार महिन्याच्या कालावधीत ट्रक्टरची निर्यात 3.4 टक्क्मयांनी वधारुन 1,509 युनिट झाली आहे. जी मागील वर्षातील जूनमध्ये 1,459 युनिट्ची निर्यात झाली असल्याची माहिती आहे.