मुंबई
सोनालिका ट्रक्टर्सच्या एकूण ट्रक्टर विक्रीत ऑक्टोबरमध्ये 5 टक्के इतकी वाढ दिसली आहे. कंपनीने ऑक्टोबरमध्ये 17 हजार 130 ट्रक्टर्सची विक्री केली आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 16 हजार 268 ट्रक्टर्सची विक्री केली होती. एप्रिल ते ऑक्टोबर कालावधीत 85 हजार 68 ट्रक्टर्सची विक्री करण्यात आली आहे. याआधीच्या वर्षात समान अवधीत 79 हजारहून अधिक ट्रक्टर्सची विक्री करण्यात आली होती.