हळूहळू आता सर्वत्र सुरळीत होत असतानाच सिनेसृष्टीही पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक मोठमोठय़ा चित्रपटाच्या घोषणा होत असतानाच काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि एस. एन. प्रॉडक्शन सहनिर्मित ‘तमाशा लाईव्ह’ या बिग बॅनर चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. पोस्टरवरूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली होती. संजय जाधव दिग्दर्शित आणि सचित पाटील, सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. दिवाळी 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱया ‘तमाशा लाईव्ह’ची अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग यांनी निर्मिती केली आहे तर सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या संगीतमय चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. या चित्रपटात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.
Previous Articleझगडणाऱया मुंबईसमोर आज पंजाब किंग्सचे आव्हान
Next Article आजचे भविष्य मंगळवार दि. 28 सप्टेंबर 2021
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.