ऑनलाईन टीम / मुंबई
वाजले की बारा.. म्हणत महाराष्ट्राच्या घरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका नविन क्षेत्रात पदार्पण करत आहे. सोनाली कुलकर्णीला एक उत्तम अभिनेत्री म्हणुन सगळे ओळखताच पण आता ती आणि तिचा धाकटा भाऊ अतुल कुलकर्णी याच्यासोबत निर्मिती क्षेत्रात पाऊस ठेवत आहे. सोनालीने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत एकत्र येत सोनाली कुलकर्णी ‘हाकामारी’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चाहत्यांनी व काही कलाकर मंडळीने सोनालीला तिच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाविषयी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनलीने इन्सटा पोस्टमध्ये याविषयी माहिती देत म्हटले आहे की, गेली १४ वर्षें मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय करत असताना तुम्ही माझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव केला. मी वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत राहिले आणि तुम्ही कायम सकारात्मक प्रतिसाद आणि उर्जा देत राहिलात.त्याच्याच बळावर आणखी एक धाडसी पाऊल उचलते आहे. आशा आहे की या नवीन प्रवासात देखील तुमची अशीच खंबीर साथ मिळेल. चित्रपटाच्या टीमचे आभार मानत सोनालिने या पोस्टच्या शेवटी ‘लक्ष असू द्या हाकामारी येतीये’, असे देखील म्हटले आहे.
‘हाकामारी’ हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर आणि नवोदित निर्माती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठीत पहिल्यांदा अशाप्रकारची वेब फिल्म करत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस या वेब फिल्मचं दिग्दर्शन करणार आहेत. मनोरंजन विश्वात असे अनेक चित्रपट आहेत जे केवळ काल्पनिक नसून सत्य घटनांवर आधारित आहेत. ‘हाकामारी’ चित्रपट हा याच प्रकारचा आहे. चाहत्यांना देखील सोनालीच्या या नविन चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे.