वार्ताहर / दोडामार्ग:
सोनावल येथे मोलमजुरी करून आपली गुजराण करणाऱया अनंत सोमा सावंत (40) या तरुणाने राहत्या घरी शुक्रवारी रात्री उशिरा विषप्राशन करून आत्महत्या केली. मानसिक संतुलन बिघडल्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. त्याच्या पश्चात्य आई व भाऊ असा परिवार आहे. तो अविवाहित होता. मोलमजुरी करून रोजी रोटी कमवायचा. या बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.